West Bengal : ममता बॅनर्जी यांचा अपघात की कटकारस्थान? मागून धक्का दिल्याचा डॉक्टरांचा खुलासा

एमपीसी न्यूज : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काल (West Bengal) एसएसकेएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयाचे संचालक मनिमॉय बंदोपाध्याय यांनी सांगितले की, सायंकाळी साडेसातच्या सुमारास मुख्यमंत्री खाली पडल्याची माहिती मिळाली. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली.  कपाळावर व नाकावर जखमा आहेत. कपाळावर तीन टाके तर नाकाला एक टाके घालण्यात आले आहेत. त्यांचे ईसीजी आणि सीटी स्कॅनही करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना रुग्णालयातच राहण्याचा सल्ला दिला होता पण त्यांनी घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे त्यांना त्यांच्या निवासस्थानी देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. परंतु, या दरम्यान डॉक्टरांनी ममता बॅनर्जी यांना कोणीतरी मागून धक्का दिल्याने हा प्रसंग घडल्याची धक्कादायक माहिती दिली. 

Maharashtra : स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाचे ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ सुरु

बंदोपाध्याय यांनी त्यांना मागून कोणीतरी धक्का दिल्याचा खुलासा केला. मुख्यमंत्र्यांच्या वहिनी कजरी बॅनर्जी यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांना मागून धक्का लागल्याचे त्यांनी ऐकले. मात्र कोणी ढकलले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. धक्का (West Bengal) चुकून किंवा जाणूनबुजून दिला आहे का? आता या प्रकरणात कटाची चर्चा सुरू झाली आहे. ममता बॅनर्जी यांना एनएसजी सुरक्षा देण्याची मागणी टीएमसी समर्थकांनी केली आहे. बंगाल पोलिसांवर आमचा विश्वास नाही. मात्र, धक्काबुक्कीचा तपास केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.