Pimpri : शाहजहॉं शेख प्रकरण; ममता बॅनर्जी यांचा पिंपरी चिंचवड भाजपाकडून निषेध

एमपीसी न्यूज – पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथील महिलांचा लैंगिक छळ व जमीन बळकावणारा तृणमूल कॉंग्रेसचा ( Pimpri) पदाधिकारी शाहजहॉं शेखला पाठीशी घालणाऱ्या पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पिंपरी चिंचवड भाजपा महिला मोर्चाकडून निषेध करण्यात आला.

यावेळी सरचिटणीस नामदेव ढाके, अजय पाताडे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य महेश कुलकर्णी, महिला मोर्चा प्रदेश सचिव कविता हिंगे, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेश चिटणीस जमील औटी, जिल्हा चिटणीस विजय शिनकर, गणेश ढाकणे, सचिन काळभोर, ओबीसी मोर्चा सरचिटणीस खंडूदेव कथोरे, दत्ता ढगे, दिनेश पाटील, मुकेश चुडासमा, संजय परळीकर, लक्ष्मी राजकाची, निगडी – चिखली मंडलाध्यक्ष स्वाती नेवाळे , चिटणीस पल्लवी पाठक, आश्विनी कांबळे, उपाध्यक्ष रुपाली लांडे, चिटणीस विमल काळभोर, दापोडी मंडल अध्यक्ष शोभा थोरात, सविता माने, पूनम माने, लक्ष्मी कलापुरे, अनघा रुद्र, नंदू कदम, वैशाली काजळे, दीपाली कलापुरे, मीनाक्षी गायकवाड, सीमा चव्हाण आदी महिला मोर्चा पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.

Dehuroad : विनापरवाना दारू हुक्का विक्री प्रकरणी तिघांना अटक

पिंपरी चिंचवड शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे तीव्र ( Pimpri) आंदोलन करण्यात आले. संदेशखाली येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करून ममता बॅनर्जींचा धिक्कार करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

तृणमूल कॉंग्रेसचा नेता शाहजहॉं शेख याने संदेशखालीमधील अनेक महिलांवर अत्याचार केला. या महिलांच्या तक्रारीनंतरही तृणमूल कॉंग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अटकेची कारवाई केलेली नाही. याप्रकरणी भाजपाने तीव्र आंदोलन केल्यानंतर अखेर 55 दिवसांनंतर आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी शाहजहॉं शेख याला फाशी देण्याच्या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहर भाजपा व महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या आदेशानुसार, शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि  महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या.

पश्चिम बंगाल सरकारने पीडित महिलांना न्याय देण्यासाठी त्वरित पावले उचलली पाहिजेत. पीडित महिलांना सुरक्षा आणि मदत पुरवण्याची व्यवस्था व्हावी. राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर तात्कालिक प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशा मागण्या करून संबंधित घटनेचा निषेध करण्यात आला.

यावेळी भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही आपले विचार व्यक्त केले. पश्चिम बंगालमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे आणि महिला सुरक्षित नाहीत. पश्चिम बंगाल सरकारने महिलांवरील अत्याचाराच्या घटनांवर तात्कालिक प्रतिबंध घालण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी यावेळी करण्यात ( Pimpri) आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.