Pune : ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा 340 किलो कच्चा माल जप्त

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांनी मागील काही दिवसांपूर्वी 4000 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त ( Pune)  केल्यानंतर आता हे ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 340 किलो कच्चामाल जप्त केला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली, ड्रग्स प्रकरणाचा तपास करत असताना एका आरोपीला कोलकत्ता येथून ताब्यात घेण्यात आले होते. त्याची आणि यापूर्वी अटक केलेल्या आरोपीची चौकशी करण्यात आली. चौकशीमध्ये विश्रांतवाडी येथील गोडाऊनमध्ये जो ड्रग्ज साठा सापडला होता, त्यातील एक आरोपी एमडी ड्रग्ज ट्रकमध्ये ठेवत असल्याचे समोर आले.

Pimpri : शाहजहॉं शेख प्रकरण; ममता बॅनर्जी यांचा पिंपरी चिंचवड भाजपाकडून निषेध

पोलिसांनी त्या ट्रकचा शोध घेतला असता तो ट्रक विश्रांतवाडी पासून तीन किलोमिटर अंतरावर आढळून आला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये 340 किलोचा साठा मिळाला. मिळालेला साठा हा एमडी आणि मेथ बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल आहे असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र, नेमके ते काय आहे हे फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर ( Pune) समजेल. मात्र, चौकशी आणि प्राथमिक पाहणीवरुन ट्रकमध्ये सापडलेला साठा हा एमडी ड्रग्ज आणि इतर ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

पुणे पोलिसांनी मागील काही दिवसात 4000 कोटी रुपयांचे अमली पदार्थ पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथून जप्त केले. या प्रकरणामध्ये आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे तपास केल्यानंतर त्यांनी काही कच्चामाल देखील एका ठिकाणी लपवून ठेवला होता. तो देखील आता पुणे पोलिसांनी जप्त केला आहे.

पिंपरी चिंचवड प्रकरणाशी संबंध नाही

पिंपरी चिंचवड पोलिसांनी देखील तब्बल 45 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. यामध्ये एका पोलीस फौजदाराचा सहभाग आढळल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाचा पिंपरी चिंचवड  ड्रग्ज प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. तसेच पुण्यातील ड्रग्ज प्रकरणाशी पोलिसांचा संबंध नसल्याचेही त्यांनी ( Pune) सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.