Pune : ज्या राज्याचे नेतृत्व एक महिला करत आहे, अशा राज्यामध्ये बलात्कारासारखे प्रकार घडणे चिंताजनक – हर्षदा फरांदे

एमपीसी न्यूज – पश्चिम बंगालमध्ये सातत्याने महिलांवरती (Pune) होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध पश्चिम बंगालचे सरकार ज्याच्या प्रमुख एक महिला आहे, या कोणतीही कडक कारवाई करताना दिसून येत नाहीत. अशा राज्यात बलात्कारासारख्या निर्घृण व निर्दयी घटना घडणे हे अतिशय चिंताजनक आहे, ज्या राज्यांमध्ये महिला सुरक्षित नाहीत, अशा राज्यांचा कारभार एक महिला चालवते यापेक्षा आणखीन दुर्दैवी काय असू शकते, असा सवाल भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी केला.

संदेश खली या गावात झालेल्या महिलांच्या अत्याचाराच्या घटनेच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने आज पुण्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी फरांदे बोलत होत्या. त्यापुढे म्हणाल्या, ममता बॅनर्जी यांना फक्त सत्ता आणि त्यातून मिळणारे लाभ यामध्येच रस आहे. पश्चिम बंगालमधील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना या त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी हे खुलेआम निर्घृण पणे करतात.

Pune Lonavala Local : रविवारी पुणे-लोणावळा दरम्यान 14 लोकल रद्द

त्यांच्यावर 55 दिवस कारवाई न करता बघ्याची भूमिका घेतात, पोलीस प्रशासन पश्चिम बंगाल मध्ये हतबल झाल्याचे चित्र यापूर्वीही आपण बघितलेले आहे. महिलांची सुरक्षा ही पश्चिम बंगालमध्ये वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येते. भारतीय जनता पार्टीची ही मागणी असेल की संबंधित जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करून एक आश्वस्त वातावरण महिलांसाठी पश्चिम बंगालच्या सरकारने केले पाहिजे, अन्यथा भारतीय जनता पार्टी त्या महिलांचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहे.

खरे तर ममता बॅनर्जी यांनी या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा, हीच आमची मागणी आहे असेही हर्षदा फरांदे यांनी सांगितले.
या आंदोलनाला हर्षदा फरांदे यांच्यासह महिला (Pune) आघाडीच्या सरचिटणीस प्रिया शेंडगे शिंदे, आरती कोंढरे, गायत्री खडके, भावना शेळके , स्वाती मोहोळ, उज्वला गौड, शामा जाधव, कोमल कुटे, प्रेरणा तुळजापूरकर आदी उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.