Mamata Banerjee : ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत; रुग्णालयात दाखल

एमपीसी न्यूज : पश्चिम बंगालच्या (Mamata Banerjee) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. डोक्याला दुखापत झाल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांना दुखापत झाल्याचे टीमएसीच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आले आहे. आमच्या नेत्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यासाठी प्रार्थना करा असे आवाहनही करण्यात आले आहे.

Pune : सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार मैदानात

मुख्यमंत्री ममता यांचे एक छायाचित्र समोर आले असून, त्यात त्यांच्या कपाळातून रक्त येत असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ट्रेड मिलवर असताना त्यांना ही दुखापत झाली. त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी (Mamata Banerjee) त्यांना रुग्णालयात घेऊन गेला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी अवस्थेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कालीघाट निवासी संकुलात होत्या. ममता बॅनर्जी या वर्षात दुसऱ्यांदा जखमी झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.