Electoral Bond Data : निवडणूक आयोगाने जाहीर केला इलेक्टोरल बाँड्सचा डेटा; कोणत्या पक्षाला मिळाली देणगी?

एमपीसी न्यूज : निवडणूक आयोगाने इलेक्टोरल बाँड्सचा डेटा (Electoral Bond Data) आपल्या वेबसाईटवर अपलोड केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर निर्णयानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) इलेक्टोरल बाँड्सचा डेटा निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला होता. निवडणूक आयोगाने अंतिम मुदतीच्या एक दिवस आधी SBI कडून निवडणूक रोख्यांबाबत प्राप्त केलेला डेटा गुरुवारी आपल्या वेबसाइटवर अपलोड केला आहे. निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून 15 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजेपूर्वी डेटा अपलोड करण्याचे आदेश मिळाले होते.

निवडणूक आयोगाने गुरुवारी निवडणूक रोख्यांची आकडेवारी सार्वजनिक केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) 12 मार्च रोजी आयोगासोबत डेटा शेअर केला होता.  निवडणूक मंडळाने अपलोड केलेल्या आकडेवारीनुसार, खरेदीदारांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, मेघा इंजिनीअरिंग, पिरामल एंटरप्रायझेस, टोरेंट पॉवर, भारती एअरटेल, डीएलएफ कमर्शियल डेव्हलपर्स, वेदांता लिमिटेड, अपोलो टायर्स, लक्ष्मी मित्तल, एडलवाईस, पीव्हीआर, केव्हेंटर वाईन, वेलस्पन आणि सन फार्मा यांचा समावेश आहे.

तर आकडेवारीनुसार, ज्या पक्षांनी निवडणूक रोख जमा केले आहेत; त्यात भारतीय जनता पक्ष, (Electoral Bond Data) काँग्रेस, AIADMK, BRS, शिवसेना, TDP, YSR काँग्रेस, DMK, JDS, NCP, तृणमूल काँग्रेस, JDU, RJD, AAP आणि समाजवादी पक्ष यांचा समावेश आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.