Pune : सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार मैदानात

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार (Pune) यांनी बंड केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या विजयासाठी स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांना भेटून बेरजेचे राजकारण सुरू केल्याची चर्चा सुरू आहे.

कट्टर विरोधक असलेल्या अनंतराव थोपटे यांची भेट घेऊन तब्बेतीची विचारपूस केली. पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे यांच्याशीही चर्चा केली. मोरे यांचा प्रभाग मोठ्या प्रमाणात बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे मोरे सुद्धा पवार यांच्या पक्षात जाणार असल्याची कुजबुज सुरू आहे. येत्या काही दिवसांतच लोकसभा निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करण्यात पवार यांचा मोठा वाटा आहे. यंदाची निवडणूक सुप्रिया सुळे यांना वाटते तेवढी सोपी नाही. त्याची जाणीव पवार यांना आहे.

Kothrud : मोनोरेल प्रकल्पामुळे झाडांची कत्तल, माजी खासदार वंदना चव्हाण यांनी जाणून घेतल्या समस्या

अजित पवार यांच्या पत्नी सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढविणार असल्याने पवारांची डोकेदुखी वाढली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी जाहीर मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे.

तर, दुसरीकडे माजी मंत्री विजय शिवतारे यांनीही बारामती (Pune) लोकसभा मतदारसंघात आपण अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिवतारे यांनी जोरदार टीका केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांना मुंबईत बोलविले आहे. शिवतारे यांचे बंड शांत होणार असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुळे आणि कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी पवार यांनी कंबर कसली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.