Hinjawadi : भंगार चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जेसीबीमधून भंगार चोरून नेणाऱ्या (Hinjawadi) दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 28) दुपारी दोन ते अडीच वाजताच्या सुमारास हिंजवडी येथे घडली.

भोला कुमार लुकाराम कुमार (वय 30, रा. औंध, पुणे. मूळ रा. झारखंड), लोकाप्पा रामन्ना राठोड (वय 19, रा. औंध, पुणे. मूळ रा. कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विजय सुखदेव सांगळे (वय 33, रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : ट्रिपल महाराष्ट्र केसरी अन् पुणे SP विजय चौधरी यांची विश्वात सुवर्ण झेप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भोला हा जेसीबी चालक आहे. त्याने (Hinjawadi) त्याच्या ताब्यातील जेसीबीमध्ये दोन हजार 800 रुपये किमतीचे 32 किलो लोखंडी सामान चोरून नेले. त्या जेसीबीवर लोकाप्पा हा लेबर म्हणून काम करतो. लोखंड चोरून नेत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.