Wakad : जबरी चोरी आणि मारहाण प्रकरणी माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षावर गुन्हा

एमपीसी न्यूज – ‘मी माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष असून माझ्या परवानगीशिवाय कामगार कसे काय ठेवले’ अशी धमकी देत एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. तसेच तरुणाचे घड्याळ आणि सोन्याची अंगठी माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षाने चोरून नेली. याप्रकरणी माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि, 5) सायंकाळी सव्वाचार वाजताच्या सुमारास माऊली चौक वाकड (Wakad) येथे घडली.

 

Wakad : रिव्ह्यू द्वारे पैसे कमवण्याचे आमिष  दाखवत तीस लाखांची फसवणूक

बबलू जोगदंड आणि त्याचे दोन ते तीन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अनिकेत वाडिया (वय 24, रा. शिवाजीनगर) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या कार्यालयात काम करत असताना आरोपी फॉर्च्यूनर गाडीतून आले. आरोपी बबलू जोगदंड आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांच्या ऑफिसमध्ये येऊन फिर्यादी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दम दिला. ‘मी येथील माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे. माझ्या परवानगीशिवाय येथे कामगार कसे काय ठेवले, असे म्हणत आरोपींनी फिर्यादीस लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
यामध्ये फिर्यादी यांच्या डोक्याला, तोंडाला, कमरेला, पोटाला, पायाला मार लागला आहे. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या हातातील पंधरा हजार रुपयांचे घड्याळ आणि पंचवीस हजार रुपयांची सोन्याची अंगठी जबरदस्तीने हिसकावून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड (Wakad) पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.