Wakad : रिव्ह्यू द्वारे पैसे कमवण्याचे आमिष  दाखवत तीस लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – गुगल मॅप लोकेशन मध्ये रिव्ह्यू द्वारे पैसे कमवण्याचे आमिष दाखवून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेत व्यक्तीची 30 लाख 35 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दोन ते 11 जून या कालावधीत वाकड  (Wakad) येथे घडला.

Chinchwad : वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात; चालकाचा मृत्यू

याप्रकरणी तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेलिग्राम आयडी धारक, बँक खातेधारक आणि मोबाईल क्रमांक धारक अशा एकूण 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना त्यांना व्हाट्सअपवर एका अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला. तुम्ही पार्ट टाइम काम करून दिवसातून दीडशे ते आठ हजार रुपये कमावू शकता, असे मेसेज मध्ये म्हटले होते.

 

गुगल मॅप लोकेशन मध्ये रिव्ह्यू द्वारे पैसे कमवण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांना एका टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांना वेगवेगळे टास्क देऊन त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी 30 लाख 35 हजार 400 रुपये घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. वाकड (Wakad) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.