Wakad : वाकडमधील ‘ती’ बिल्डिंग पाडली; बिल्डरला नोटीस

एमपीसी न्यूज – तीन मजली बांधकाम सुरू असताना वाकड भागातील ( Wakad) झुकलेली इमारत आज बुधवारी पाडण्यात आली. याबाबत महापालिका बिल्डरला नोटीस देखील देणार आहे.

 थेरगाव येथे बांधकाम व्यावसायिक सुनील दोलवानी यांच्या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इमारतीचे जवळपास सर्व काम पूर्ण होत आले आहे. मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास या इमारतीच्या बांधकामाने आपली जागा सोडली. त्यामुळे इमारत वाकली गेली. या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

 PCMC : शहरातील 1100 हाेर्डिंगधारकांना  नाेटीसा

राहुल सरोदे यांनी थेरगाव उप अग्निशमन केंद्राला याबाबत माहिती दिली. त्यानुसार पिंपरी आणि थेरगाव येथील अग्निशमन बचाव पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. दरम्यान पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले.वाकलेली इमारत पाहण्यासाठी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. इमारत पडणार अशी भीती सर्वजण व्यक्त करत होते.

महापालिका बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी पाहणी केली. बांधकाम वाय पद्धतीचे म्हणजेच चार ऐवजी दोन पिलरवर उभारण्यात आल्याने अशी परिस्थिती उदभवल्याचे  दिसून आले आहे. तळमजला अधिक तीन मजले या बांधकाम पद्धतीवर उभारणे जीवघेणे ठरणार, असा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला. अखेरीस सकाळी ही इमारत पाडण्यात ( Wakad)  आली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.