PCMC : शहरातील 1100 हाेर्डिंगधारकांना  नाेटीसा

एमपीसी न्यूज –  महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाने ( PCMC)  शहरातील 1100 हाेर्डिंगधारकांना थकीत शुल्क भरण्यासाठी नाेटीसा दिल्या आहेत. थकीत शुल्काची रक्कम 29 फेब्रुवारीपर्यंत भरावी, अन्यथा हाेर्डिंग अनधिकृत गृहीत धरून कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

शहरातील उभारलेल्या अधिकृत  हाेर्डिंगचे  नुतनीकरणाची कार्यवाही मागील वर्षात किवळेतील दुर्घटनेनंतर थांबविण्यात आली होती. त्यानंतर आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून  नुतनीकरणाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार अकराशे हाेर्डिंगधारकांना मागणी (डिमांड) नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांना शुल्काची रक्कम जमा करण्यासाठी 29 फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे.

Alandi : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आळंदी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

शहरात महापालिकेच्या जागेत जाहिरात फलक उभारले जातात. तसेच, खासगी जागा मालकांना जाहिरात फलक उभारण्यास परवानगी दिली जाते. हेच महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या उत्पन्नाचे साधन आहे. अनधिकृतपणे होर्डिग उभारून जाहिरातदार पालिकेचे उत्पन्न बुडवतात. तसेच, परवाना घेतल्यानंरही शुल्क भरले जात नाही. दरम्यान, 17 एप्रिल 2023 मध्ये किवळेतील होर्डिग दुर्घटनेनंतर सर्वच जाहिरात फलकाचे स्ट्रक्चरल रिपोर्ट घेण्यात आला. परंतु, होर्डिग परवाना नुतनीकरणाची प्रक्रिया थांबविण्यात आली होती.

अखेर आकाशचिन्ह व परवाना विभागाने ही कार्यवाही सुरू केली. हे नुतनीकरण 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी होणार आहे. त्या प्रमाणे संबधित होर्डिग्जधारकांना मागणी नोटीसा देण्यात आल्या आहेत. त्यांना शुल्काची रक्कम जमा करण्यासाठी 29 फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. शुल्क जमा केल्यानंतर परवान्याचे नुतनीकरण होणार आहे. ज्या फलकाचा जाहिरात परवाना नुतनीकरण होणार नाही. तो अनधिकृत म्हणून काढून टाकण्याची कारवाई केली ( PCMC)  जाणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.