Pimpri :  काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर; सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभा निवडणूक लढवणार

एमपीसी न्यूज –  काँग्रेसकडून राज्यसभा  ( Pimpri)  उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून त्या राज्यसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत. 

PCMC : शहरातील 1100 हाेर्डिंगधारकांना  नाेटीसा

सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभा निवडणूक लढवणार आहेत. याव्यतिरिक्त बिहारमधून अखिलेशप्रताप सिंह, हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनु सिंघवी यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. यासोबतच काँग्रेस महाराष्ट्रात विधानसभेची एकच ( Pimpri)  जागा लढवणार आहे, हे आता स्पष्ट झालं आहे.

काँग्रेसची यादी  

  • काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी : राजस्थान
  • अखिलेश सिंह : बिहार
  • अभिषेक मनू सिंघवी : हिमाचल प्रदेश
  • चंद्रकांत हांडोरे : महाराष्ट्र

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.