Alandi : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आळंदी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन ( Alandi) बोलवावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून‌ बुधवार दि.14 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यानिमित्ताने आळंदी देवाची बाजार पेठ  बंद ठेवण्याचे आवाहन  सकल मराठा समाज आळंदी देवाची यांच्या वतीने करण्यात आले आहे.त्याला मोठ्या प्रमाणात उस्फुर्त प्रतिसाद  मिळाला.

Pimpri : सोहम सार्वजनिक ग्रंथालयाच्या विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवा परिक्षेत घवघवीत यश

 सकाळी सकल मराठा समाज आळंदी देवाची यांच्या वतीने चाकण चौक ते महाद्वार चौक पर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला होता. तसेच या ठिकाणी डी डी भोसले पाटील, उत्तमराव गोगावले , आनंदराव मुंगसे, मल्हार काळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. गेल्या पाच दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण चालू आहे. त्यांची प्रकृती खालवली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. शरीरावर विविध परिणाम होत आहेत.

यामुळे महाराष्ट्रात त्याचा  परिणाम होऊ शकतो. आपले उपोषण अंतिम टप्प्यात आले आहे. त्यांनी उपोषण सोडले तरी चालेल.कारण भविष्यात सरकारचे षडयंत्र हाणून पाडता येईल.सर्व मराठा समाज समन्वयकानी त्यांना विनंती करावी उपोषण सोडावे व पुढच्या लढ्यास सज्ज व्हावे.  सरकारने 15 चे  हे अधिवेशन आता 20 तारखेला बोलवलं आहे. यात मनोज जरांगे यांच्या विरुद्ध मोठे  षडयंत्र आहे . सकल मराठा समाज आळंदी देवाची यांच्या मान्यवरांनी येथे मनोगतातून  सांगितले. तसेच  श्री भैरवनाथ मंदिर येथे एक दिवसाचे  लाक्षणिक उपोषण ठेवण्यात ( Alandi)  आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.