Pimpri : सोहम सार्वजनिक ग्रंथालयाच्या विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवा परिक्षेत घवघवीत यश

एमपीसी न्यूज – पिंपरीतील सोहम सार्वजनिक ग्रंथालयाच्या ( Pimpri ) विद्यार्थ्यांचे प्रशासकीय सेवा परिक्षेत घवघवीत य़श संपादन केले आहे.  सोहम ग्रंथालय व अभ्यासिका या संस्थेतून प्रशासकीय सेवेत योगिता नरवडे – यूपीएसी / आयएसएसआर  एआयआर  /  , प्रशांत घुटुकडे –  पीडब्ल्यूडी कनिष्ठ अभियंता, ऋषिकेश पडूळ- पीडब्ल्यूडी स्थापत्य अभियंता सहाय्यक,  रोहिणी काकडे – पीडब्ल्यूडी स्थापत्य अभियंता सहाय्यक , रामप्रसाद अंबूरे- तलाठी सोलापूर जिल्हा, शामल उभे – पीडब्ल्यूडी स्थापत्य अभियंता सहाय्यक,सायली पाठक – सीए फाउंडेशन असे यश संपादन केले आहे.

Tata Motors EV : टाटा इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत घट

याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर सर यांनी संस्थेबाबत माहिती सांगून प्रस्ताविकेतून पुढील आपले  विचार प्रकट केले.सर्वांगीण अभ्यास आणि भोवतालच सूक्ष्म निरीक्षण, दुर्दम्य  इच्छा शक्ती,अवांतर वाचन, सातत्य जिद्द,चिकाटी आणि स्मार्ट वर्क अभ्यासाचे आणि वेळेचे नियोजन यावर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्ष दिले तर यश निश्चित मिळेल असे नेरकर सरांनी विशद केले.

लवकरच एनडीए व मिल्ट्री सर्विसेस याबाबत विद्यार्थ्यांना  अभ्यासासाठी लागणारी पुस्तके व  मान्यवरांचे मार्गदर्शन अभ्यासिकेत यथा  योग्य नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. प्रदीप बोरसे यांनी सूत्रसंचालन केले व ग्रंथपाल वर्षा बोरसे यांनी आभार ( Pimpri ) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.