Tata Motors EV : टाटा इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत घट

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्सच्या टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (TPEM) या उप कंपनीने ( Tata Motors EV)  त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या ईव्ही नेक्सॉन व ईव्ही टीएगो या वाहनांच्या किमती कमी केल्या आहेत.

ईव्ही नेक्सॉनच्या किमतीमध्ये सुमारे एक लाख 20 हजार रुपयांची घट झाली आहे. टीएगो ईव्हीच्या किंमतीमध्ये सुमारे 70 हजार रुपयांची घट झाली आहे. बेस मॉडेलची किंमत सात लाख 99 हजार रुपयांपासून सुरू होत आहे.

Moshi : दुचाकी चोरली कामापुरता वापर केला आणि पुन्हा आहे तिथे पार्क केली

नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या पंच ईव्ही या सुरुवातीच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. कारण पुढील काही कालावधीत या वाहनाच्या बॅटरीच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे.

टीपीईएमचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले, इलेक्ट्रिक व्हेईकलच्या एकूण किमतीमध्ये बॅटरी खर्चाचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. नजीकच्या काळात बॅटरी सेल किमती स्थिर होण्यासह भविष्यात त्यांच्या किमतींमध्ये संभाव्य कपात होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आम्ही ग्राहकांना फायदे देण्याचे सक्रिय पाऊल उचलले आहे. इलेक्ट्रिक व्हेईकलमध्ये गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढ  ( Tata Motors EV)  झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.