PCMC :  एक हजार मालमत्ता जप्त; थकीत कर भरून जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी ( PCMC)  विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीचा धडाका सुरू केला आहे. आतापर्यंत 346 मालमत्ता सील, 538 मालमत्तांवर जप्ती अधिपत्र डकविले, 128 मालमत्ता धारकांचे नळजोड खंडित अशा 1 हजार 12 मालमत्ता धारकांवर थेट कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे थकबाकीदार मालमत्ता धारकांचे धाबे दणाणले आहेत. उर्वरित दिड महिन्यात जप्ती मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा महापालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

मालमत्ता सिल करणे, जप्त करणे आणि नळ कनेक्शन बंद करणे याचे दैनंदिन उद्दिष्ट किमान 500 आहे. या गतीने पन्नास हजारावरील थकीत रकमा असलेल्या सर्व मालमत्ता 31 मार्चपर्यंत जप्त किंवा सिल होणार आहेत. याचा थकबाकीदार यांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. विशेषतः आर्थिक स्थिती असूनही 8 ते 10 वर्षे कर न भरलेल्या लोकांची संख्या लक्षणीय आहे. पालिकेच्या विकासाचे दृष्टीने ही हानिकारक बाब आहे. पिंपरी चिंचवड शहरात 6 लाख 15 हजार निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आदी नोंदणीकृत मालमत्ता आहेत.  या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी महापालिकेचे 17 झोन आहेत. तसेच ऑनलाईन आणि विविध ॲपच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत 4,31,000 मालमत्ता धारकांनी तब्बल 746 कोटींचा कर महापालिका तिजोरीत जमा केला आहे.

1 लाख 82 हजार निवासी मालमत्ता धारकांकडे तब्बल चारशे 19 कोटी रुपये थकीत

पिंपरी चिंचवड शहरात निवासी मालमत्ता धारकांची संख्या मोठी आहे. यामध्ये 1 लाख 82 हजार 665 मालमत्ता धारकांकडे तब्बल  चारशे 19 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. बिगर निवासी मालमत्ता धारकांकडे 183 कोटी तर मोकळा जागा मालकांकडे 92 कोटींसह  इतर मालमत्ता धारकांकडे तब्बल 769 कोटी 72 लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदार मालमत्ता धारकांना वारंवार कर भरण्याचे आवाहन केले. मात्र, वारंवार आवाहन करूनही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकीत निवासी मालमत्ता धारकांकडे महापालिकेने मोर्चा वळवला आहे. सदनिका सील करण्यासह अधिपत्र डकविले (तुमची मालमत्ता जप्त करून लिलाव करणे) या सारख्या ( PCMC) गंभीर इशारा देण्यात येत आहे.

वापरनिहाय थकबाकीदार मालमत्तांची संख्या

निवासी-1लाख 82 हजार 665
बिगर निवासी -22 हजार 165
औद्योगिक -01 हजार 389
मिश्र- 6 हजार 526
मोकळ्या जागा – 5 हजार 402
इतर -237

‘हायटेक दवंडी’चा खुबीने वापर

21 व्या शतकात तंत्रज्ञान विकसित होत असतानाही महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने ‘हायटेक दवंडी’चा अत्यंत खुबीने वापर करण्यात येत आहे.  ज्या गृहनिर्माण संस्थांमध्ये कर थकीत आहे अशा सदनिका धारकांकडे किती थकबाकी आहे, सदनिका जप्तीची कारवाई केल्याची माईकव्दारे जाहीर घोषणा केली जात आहे. तसेच इतर थकबाकीदारांनी त्वरित कर भरावा असे आवाहनही करण्यात येत आहे. विशेष म्हणजे थकीत कर भरल्यानंतर संबंधित थकबाकीदाराचे माईकव्दारे जाहीर आभार मानले जात आहे.

किवळे झोनमध्ये सर्वाधिक जप्ती तर  पिंपरी नगरमध्ये फक्त दोन कारवाया

महापालिकेच्या 17 झोनमध्ये थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त, सील करणे, नळ कनेक्शन खंडित करणे यासारख्या कारवाया करण्यात येत आहेत. 17 झोनपैकी किवळे झोनमध्ये 154, सांगवी -133, मोशी -128, फुगेवाडी-दापोडी -112 तर सर्वात कमी पिंपरी नगरमध्ये फक्त दोन कारवाया करण्यात आल्या आहेत.

‘या’ बड्या गृहनिर्माण संस्थांमधील सदनिका सील आणि जप्त आकुर्डी झोनमध्ये ऐश्वर्यम व्हेंचर्स -5, बालाजी हाईटस् – 7 फ्लॅट जप्त, सुखवानी कॉर्नर-1, सिद्धांत आंगण-4,  थेरगाव झोनमध्ये काळेवाडीतील आम्मा हौसिंग सोसायटी -8, वाकड झोनमध्ये – स्किम अटलांटा- II-3, स्किम अटलांटा-6,अरमाडा-2, कुमार पिकॅडीली-3, पुणे व्हिले-15, सिरक्को-21,प्लुमेरीया ड्राईव्ह-10, चिंचवड झोनमध्ये – श्री समर्थ फ्लॅट -4, एस.बी.पाटील/गोलांडे असो-7,संकेत नेस्ट-2., झोनचे नाव – मनपा भवन झोन -रेणुका गुलमोहर एच इमारत मोरवाडी-3,

श्रध्दा हेरीटेज-2, अमृतेश्वर अपार्टमेंट -4, रेणूका निवास नेहरूनगर-6, वाघेरे टॉवर-6. किवळे झोनमध्ये – जी.के.सिल्व्हर लँड – 1, ट्रॉपिका -1,कुणाल आयकोनिया -1, साई कुंज-2, पलाश हौ. सोसायटी-2,0 सेलिस्टीयल सिटी-2, कोहिनुर ग्रँड्युअर-1, जी.के.रॉयल हिल्स-1, अक्वा ब्लु- 2,अक्वा मरीना-1,सांगवी झोनमध्ये -साई निरंजन- 8, एस्टर 9, पार्वती क्लासीक -3,स्वप्न शिल्प -6, चांगभले हाईटस-17,सागर कॉल्प्लेक्स -7,पिंपळे सदन- 10, चऱ्होली झोनमध्ये-किंग्सबरी  – 02, लाँग आयर्लंड-1, जेनेसिस एक्सपॅक्ट-4, निगडी प्राधिकरण झोनमध्ये – चंद्रलोक हाउसिंग सोसायटी-4,  पंचशील हाउसिंग सोसायटी-3, भैरवी अपार्टमेंट-3 या सोसायटीमधील फ्लॅट सील अथवा जप्त करण्यात ( PCMC)  आले आहेत.

जप्त केलेल्या मालमत्तांची लिलाव मूल्यांकन प्रक्रिया वेगाने करण्यासाठी स्वारस्य अभिव्यक्ती मागवण्यात आली आहे. आतापर्यंत तीन गवर्नमेंट व्हॅल्यूअर यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यांना पॅनेलवर घेण्याची प्रक्रिया या आठवड्यात पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर कायदेशीर लिलाव बोलावण्यात येईल. अशी अप्रिय कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता जप्त झालेल्या मालमत्ता धारकांनी तत्काळ मालमत्ता कराचा भरणा करून कारवाई टाळावी असे आवाहन करण्यात येत आहे. मी याचा वैयक्तिक पातळीवर साप्ताहिक आढावा घेत आहे.

प्रदीप जांभळे-पाटील,अतिरिक्त आयुक्त,

एक हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर संकलन विभागाकडून हर तऱ्हेचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सोशल मीडिया, प्रसार माध्यमे यातून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येक झोनला दैनंदिन जप्ती व नळ कनेक्शन बंद करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. 31 मार्चपर्यंत ही मोहीम अधिकाधिक तीव्र करण्यात येईल. आर्थिक क्षमता असूनही 8 ते 10 वर्षापासून कर न भरणाऱ्या निवासी मालमत्तांवर कारवाई होणे अटळ आहे. माननीय अतिरिक्त आयुक्त यांच्या सूचनेनुसार पाणी पट्टी वसुलीवरही भर देण्यात येत आहे.

नीलेश देशमुख, सहायक आयुक्त,

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.