Alandi : कर्जाची परतफेड करून ही 25 गुंठे जमीन परस्पर दुसऱ्याला दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – तब्बल अकरा लाख तीस हजार रुपये देत कर्जाची परतफेड करून ही एका शेतकऱ्याची 25 गुंठे जमीन परस्पर दुसऱ्याला दिल्याप्रकरणी आळंदी (Alandi) पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना तीन मार्च 2018 ते सात जुलै 2023 या कालावधीत आळंदी येथील कोयाळी परिसरात घडली आहे.

Nigdi : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वत:पासून सुरुवात करा; अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे आवाहन

याप्रकरणी सुदाम नारायण भाडळे वय 65 कोयाळी खेड यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून मोहन गणपत गंगावणे रा कोयाळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांचा सातबारा काढण्यासाठी सायबर कॅफे येथे गेले असता त्यांच्या निदर्शनास आले की त्यांची 25 गुंठे जमीन ही परस्पर संतोष जगन्नाथ भाडळे यांना दिली आहे याविषयी माहिती घेण्यासाठी फिर्यादी हे आरोपीकडे गेले यावेळी आरोपीने कर्जाची रक्कम व व्याज असे वीस लाख रुपये दिल्याशिवाय जमीन मिळणार नाही असे सांगितले.

याउलट फिर्यादी यांनी अकरा लाख रुपये कर्ज व त्यावरील व्याज 30000 असे अकरा लाख तीस हजार रुपये आरोपीला दिले होते असे असताना देखील आरोपीने फिर्यादीला दमदाटी व शिवीगाळ करत घरातून हाकलून दिले व त्यांची जमीन परस्पर ही संतोष भडाळे याला विकली आपली फसवणूक झाली आहे लक्षात येताच फिर्यादी यांनी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.