इंद्रायणी नदीत आढळलेल्या महिलेचा खून, आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदीच्या पात्रात आळंदी जवळ निरगुडी येथे (दि.12) रोजी एका महिलेचा मृतदेह आढळला. शवविच्छेदन महिलेच्या डोक्यात हत्याराने मारून खून केल्याचे उघड झाले आहे.याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.15) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल कऱण्यात आला असला तरी अद्याप त्या महिलेची ओळख पटलेली नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपीवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आळंदी पोलिसांना निरगुडी येथे इंद्रायणी नदीच्या पात्रात एका महिलेचा मृतदेह आढळला. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास केला. महिलेच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या डोक्यात कठीण व बोथट हत्याराने मारून तिचा खून केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे अज्ञातांनी महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीत फेकून दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून तिची ओळख पटवून गुन्ह्याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान आळंदी पोलिसांसमोर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.