Breaking news: 14 फुटी अजगराला, वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या कडून मिळाले जीवनदान

एम पी सी न्यूज : कामशेत जवळील पाथरगाव येथील आदिवासी समाजाच्या झोपडी मध्ये अन्नाच्या शोधत असलेल्‍या 14 फूट इंडियन रॉक पायथन (अजगर) हा शिरल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य, विशाल केदारी, कालिदास केदारी यांनी त्या अजगराला रेस्क्यू केले.

त्यानंतर त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना कळवले. त्यानंतर त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी  (वडगाव मावळ)  हनुमंत जाधव यांना  कळवले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे व सदस्य गणेश निसाळ, तुषार अ सातकर, सत्यम सावंत, तुषार ओव्हाळ, जिगर सोळंकी यांच्या मदतीने निलेश गराडे यांनी लगेच अजगरची प्राथमिक तपासणी करुन त्याला वनरक्षक साईनाथ खटके यांच्या उपस्थितीत त्याला निसर्गाच्या सानिध्यात जवळपास सोडण्‍यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.