Khed : शाळेतील लॅब मधून लॅपटॉप व ड्रोन चोरीला

एमपीसी न्यूज- शाळेतील सायन्स लॅबचे कुलूप तोडून चोरट्यांनी लॅबमधून लॅपटॉप ड्रोन व ड्रिल मशीन चोर नेली आहे. ही घटना आंबेठाण खेड (Khed) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (दि.4)घडली.

Khadki : गीता आश्रम संस्थेचा श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा साजरा

याप्रकरणी रोहिदास बबन येळवंडे (वय 50 रा चाकण) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या लबचे कुलूप तोडून चोरट्याने लॅब मध्ये प्रवेश केला. चोरांनी लिनोवो कंपनीचा लॅपटॉप वीर कंपनीचा ड्रोन व ड्रिल मशीन असा एकूण 21 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला माळुंगे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.