PCMC News: सहाय्यक आयुक्त खांडेकर यांच्याकडील प्रशासन काढले, उपायुक्त जोशी यांची ‘पॉवर’ वाढली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एक उपआयुक्त आणि एक सहाय्यक आयुक्तांच्या कार्यभारात बदल करण्यात आला. सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्याकडील प्रशासन विभाग काढला असून उपायुक्त विठ्ठल जोशी यांच्याकडे प्रशासनाची धुरा सोपविली आहे. त्याचबरोबर सर्व विभागांकरीता जोशी यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे त्यांची ‘पॉवर’ वाढली.

आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार उपआयुक्त विठ्ठल जोशी यांच्याकडे यापूर्वी दक्षता व गुणनियंत्रण (प्रशासकीय व तांत्रिक बाबींसह), माहिती व तंत्रज्ञान, नागरी सुविधा केंद्र आणि क्रीडा या विभागांची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांच्याकडे सामान्य प्रशासन, दक्षता व गुणनियंत्रण (प्रशासकीय व तांत्रिक बाबींसह) या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. उपआयुक्त जोशी हे सर्व विभागांकरीता समन्वयक म्हणून कामकाज पाहणार आहेत. त्यांची आस्थापना सामान्य प्रशासन विभागात असणार आहे.

pimpri news: भूषण जगताप यांची नियुक्ती

तसेच प्रदीर्घ रजेवर गेलेले सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांच्याकडे यापूर्वी निवडणूक व जनगणना (आधार कार्ड योजना) आणि प्रशासन विभागाचे कामकाज सोपविण्यात आले होते. आता त्यांच्याकडे क्रीडा, माहिती व तंत्रज्ञान, नागरी सुविधा केंद्र (आधार कार्ड योजना), निवडणूक व जनगणना या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची आस्थापना क्रीडा विभागात राहील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.