Pune fire : वडगाव शेरी, सोपान नगर येथील गोडाउनला भिषण आग

एमपीसी न्यूज : वडगाव शेरी, सोपान नगर येथील गोडाउनला भिषण आग लागली आहे. पुणे अग्निशमन दलात दुपारी 11:58 वाजता आगीची माहिती मिळाली असता (Pune fire) पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून व महापालिकेचा खाजगी टँकर अशी एकुण 15 गाड्या तसेच सुमारे 8 अधिकारी व 50 जवान आग विझवण्यात मदत करत होते. सध्या आग विझवण्यात आली असून कुलिंग करण्याचे काम सुरू आहे.

PCMC News: सहाय्यक आयुक्त खांडेकर यांच्याकडील प्रशासन काढले, उपायुक्त जोशी यांची ‘पॉवर’ वाढली

सदर गोडाउनमधे टाकाऊ माल जसे प्लास्टिक मटेरियल, लोखंडी वस्तु, डबे, भांडी व इतर साहित्यासीबत काही गॅस सिलेंडर देखील होते. या ठिकाणी किमान 10 ते 12 सिलेंडरचा स्फोट झालेला आहे.(Pune fire) अद्याप तरी कोणी व्यक्ती आत  अडकले असल्याची अथवा जखमी वा जिवितहानी झाल्याची माहिती कळलेली नाही. तसेच गोडाउन मालक यांना याबाबत विचारले असता त्यांनी ही आतमध्ये कोणी कामगार नाही असे सांगितले आहे. आगीचे कारण अजून समजले नसून पुर्ण आग विझवण्यात किमान 1/2 तासाचा अवधी लागला. जेसीबी ही मदतीसाठी दाखल झाले आहे. आग विझवण्यात आली असून.. सध्या कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.