Shiv Grewal : मृत्यूनंतर अवघ्या सात मिनिटांत परत आले प्राण; वाचा अभिनेता शिव ग्रेवालच्या पुनर्जन्माची रोमांचकारी घटना

एमपीसी न्यूज : हल्ली रील्समध्ये तुम्ही ‘मौत को छुके, झट से वापस आया’ हा विनोदी डायलॉग (Shiv Grewal ) ऐकतच असाल. पण अशी घटना एका भारतीय अभिनेत्यासोबत खरोखरच घडली आहे, असे म्हंटले तर तुम्हाला नवलच वाटेल ना?  होय, 60 वर्षीय ब्रिटन स्थित असलेल्या शिव ग्रेवाल या भारतीय अभिनेत्याने आपल्या आयुष्यातील चमत्कारी घटना शेयर केली आहे.. यामुळे केवळ भारतात नाहीतर जगभरात चर्चा सुरू झाली आहे. 

शिव ग्रेवाल यांच्यासोबत 9 फेब्रुवारी 2013 रोजी त्यांच्या लंडन येथील घरात ही घटना घडली. त्यांनी पत्नी एलिसनसोबत जेवण केले आणि काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. एलिसनने रुग्णवाहिका बोलावली पण तोपर्यंत उशीर झाला होता. शिव यांचा मृत्यू झाला. त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. परंतु, ते पुन्हा जिवंत होतील अशी कल्पना आणि अपेक्षा कोणीच केली नव्हती. अवघ्या सात मिनिटांत त्यांचे प्राण त्यांना परत मिळाले.

या सात मिनिटांत ते कुठे होते? काय करत होते? याबाबत त्यांनी (Shiv Grewal ) सविस्तर सांगितले आहे. अशा अनुभवांना ‘आफ्टर लाइफ एक्सपिरियन्स किंवा एनडीई’ (निअर डेथ एक्सपिरियन्स) असेही म्हणतात.

न्यूयॉर्क पोस्टच्या पत्रकाराने त्यांना या 7 मिनिटांचा अनुभव विचारल्यावर ते म्हणाले, की  ‘मला कसे तरी कळले होते की मी मृत आहे. मला माझ्या शरीरापासून गोष्टी वेगळ्या वाटल्या. मी शून्यात होतो. परंतु भावना आणि संवेदना अनुभवण्यास सक्षम होतो.

मी शरीरात नव्हतो. मला वाटते की हे काहीसे पाण्यात पोहण्यासारखे होते, तुम्हाला वजनहीन आणि भौतिक जगापासून डिस्कनेक्ट झाल्यासारखे वाटते. एका क्षणी मी चंद्रावर प्रवास करत होतो आणि मला उल्कापिंड आणि संपूर्ण जागा दिसत होत्या.

PMPML : संपादरम्यान पीएमपीएमएलच्या कार्य तप्तरतेमुळे लोकांची गैरसोय टळली; पीएमपीएमएलचे स्पष्टीकरण

शिव म्हणाले की, ‘मला असे वाटले की जणू काही शक्यता, विविध जीवन आणि पुनर्जन्म मला अर्पण केले जात आहेत. मला ते नको होतं. मी स्पष्टपणे सांगितले होते की मला माझ्या शरीरात, माझ्या वेळेत परत यायचे आहे आणि माझ्या पत्नीसोबत राहायचे आहे.

नंतर रुग्णवाहिका माझ्या घरी पोहोचली आणि डॉक्टरांना त्यांच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू करण्यात यश आले. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ते म्हणाले, की मी मृत्यूला सामोरे गेल्यानंतर आता माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.

मात्र या अनुभवानंतर मृत्यूनंतरच्या जीवनावरचा त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. ते म्हणाले, की ‘मला यामुळे मरणाची भीती कमी वाटते, पण त्याच वेळी मी जास्त घाबरतो, कारण माझ्या आयुष्यात जे काही आहे ते किती मौल्यवान आहे? हे मला कळले आहे. जीवनाप्रती माझी इच्छाशक्ती वाढली आहे. माणसाने त्यांच्या आयुष्यात चांगुलपणाने दयाळूपणे वागणे आवश्यक आहे असे मला नेहमीच वाटत आले आहे. परंतु, या अनुभवानंतर मला आता ते माझ्या आत खूप खोलवर जाणवते आहे, हे एक मूलभूत सत्य आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.