PMPML : संपादरम्यान पीएमपीएमएलच्या कार्य तप्तरतेमुळे लोकांची गैरसोय टळली; पीएमपीएमएलचे स्पष्टीकरण

एमपीसी न्यूज : ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील (PMPML) कोथरूड, पुणे स्टेशन व वाघोली डेपोतील इलेक्ट्रिक व सीएनजी बसेस वरील चालकांनी दिनांक 25 ऑगस्ट आणि 26 ऑगस्ट रोजी संप पुकारला होता. यावर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाने परिपत्रक जारी करून आपली भूमिका मांडली आहे. यामध्ये त्यांनी संपावेळी प्रवाशांची गैरसोय झाली नसून महामंडळाने तत्परतेने खासगी बसेसवर मंडळाचे चालक दिल्याने लोकांची गैरसोय टळली असल्याचे म्हंटले आहे. 

पुणे महानगर परिवहन महामंडळाने या परिपत्रकात म्हंटले आहे, की हा संप प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता आडमुठे धोरण स्वीकारून पुकारला होता. तथापि ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील चालकांनी पुकारलेल्या संपाचा पीएमपीएमएलच्या बससेवेवर कोणताही परिणाम होवू नये यासाठी प्रशासनाने महामंडळाकडील चालक खासगी बसेसवरती नेमून प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेतली होती.

ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील चालकांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील सर्व अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, वाहक व चालक यांच्या असलेल्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करून पुणेकरांची गैरसोय होऊ नये (PMPML) म्हणून महामंडळाकडून नियमित मार्गस्थ होणारे जवळपास सर्व शेड्युल मार्गस्थ करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

तसेच खासगी बस ठेकेदाराकडील चालकांच्या संपामुळे पीएमपीएमएलच्या बससेवेवर फारसा परिणाम झाला नसल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

दिनांक – 24 ऑगस्ट 

मार्गावरील बसेसची संख्या – 1705 

प्रवाशी संख्या – 13,45,091

उत्पन्न – 1,88,97,922

दिनांक – 25 ऑगस्ट 

मार्गावरील बसेसची संख्या – 1602

प्रवाशी संख्या – 13,00,749

उत्पन्न – 1,78,24,220

 

परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांनी संपकाळात निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच साप्ताहिक सुट्टी असताना देखील जे चालक, वाहक व वर्कशॉप कर्मचारी कामावर रुजू झाले त्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले.

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडकरांनो पिंपरी चिंचवडमधील झाडं वाचवायला आज येताय ना?

पीएमपीएमएलची बससेवा ही अत्यावश्यक सेवा आहे व या बससेवेवर सर्व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. त्यामुळे ट्रॅव्हलटाईम या खासगी बस ठेकेदाराकडील चालकांनी पुकारलेल्या संपामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळून प्रवाशी सेवा सुरळीतपणे सुरु ठेवण्यासाठी पीएमपीएमएलकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

दरम्यान कोथरूड डेपोकडील ट्रॅव्हलटाईमच्या चालकांचा संप मिटला आहे. मात्र ट्रॅव्हलटाईम या ठेकेदाराकडील पुणे स्टेशन व वाघोली डेपोतील चालकांनी संप मागे न घेतल्याने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियमनुसार महाराष्ट्र शासनाकडून संप न करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पीएमपीएमएलद्वारे सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.