Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडकरांनो आपल्या शहरातील झाडं वाचवायला आज येताय ना?

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या (Pimpri Chinchwad) अनेक महिन्यांपासून अवैध वृक्षतोडीच्या घटना घडत आहेत. ही अवैध वृक्षतोडीच्या शृंखला तोडण्यासाठी आणि कायमची बंद करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील नागरिक, वृक्ष व पर्यावरण प्रेमींनी एकजुट दाखवणे गरजेचे आहे. 

यापुढे कसलीही अवैध वृक्षतोडी खपवून घेतली जाणार नाही हा संदेश महानगरपालिका, पोलीस आणि लोकप्रतिनिधी व प्रामुख्याने अवैध वृक्षतोड करणाऱ्यांना देण्यासाठी एक तास – एक दिवा झाडांसाठी – अवैध वृक्षतोड विरोधी एकजुट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या एक तासाचे नियोजन –

  1.  सध्याची अवैध वृक्षतोडीची परिस्थिती
  2.  अवैध वृक्षतोडी संदेर्भातील कायदे
  3.  वृक्षप्राधिकारण, वनविभाग आणि पोलिसांचे कर्तव्य व जबाबदारी
  4.  नागरिकांची भुमिका
  5.  वृक्षतोडी बाबत समज गैरसमज (Pimpri Chinchwad)
  6.  पर्यावरण प्रतिज्ञा

हा कार्यक्रम आज संध्याकाळी (27 ऑगस्ट) 6 ते 7 वाजे दरम्यान PCNTDA Circle, स्पाईन रोड, भोसरी MIDC पोलीस स्टेशन मागे होणार आहे. या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे तसेच येताना एक दिवा घेऊन येण्याचे आवाहन प्रशांत राऊळ यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.