Alandi : लक्ष्मण महाराज पाटील यांनी भूतकाळातील वक्तव्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी

एमपीसी न्यूज – काल दि.5 ऑगस्ट रोजी आळंदीमध्ये एका व्हाट्स ग्रुपवरती (Alandi ) लक्ष्मण महाराज पाटील यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली असून त्यांनी त्या किर्तनामध्ये आळंदीबाबत आक्षेपार्ह (गैरप्रकारे) विधान केले आहे.

व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले की, जर आळंदीमध्ये तुम्ही कधी आलात ,तर आळंदी पहिल्या सारखी राहिली नाही. पहिले महाराज लोकांना चोरासारखं राहाव लागत होते, आता आम्ही आळंदीत बाप आहे सगळ्यांचे . आळंदीत काही मॅटर घडू द्या, मला कळू द्या, जर तुमचं मॅटर साॅलव्ह नाही झालं, मी कीर्तन सोडून देईल. पायावर जाऊ नका बिघडणार नाय  हाणतोय मी. पोलीस स्टेशनचं मॅटर असू द्या, दवाखान्याचं असू द्या ,काही असू द्या दहा मिनिटात रफा दफा.

Chinchwad : अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी दीड हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

त्यानंतर या व्हिडिओमधील वक्तव्याचा आळंदीकर ग्रामस्थांच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. वारकरी (Alandi ) संप्रदायमध्ये ही भाषा शोभते का असा सवाल करत लक्ष्मण महाराज पाटील यांनी जाहीर माफी अशी मागणी समस्त आळंदीकर ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली  होती.

यावर लक्ष्मण महाराज पाटील यांचा दिलगिरी व्यक्त करतानाचा  व्हिडिओ आला आहे. ते म्हणाले , माझ्या भूतकाळात झालेल्या किर्तनातील वक्तव्यामुळे आळंदीतील कोणाच्या व्यक्तीगत भावना जर दुखावल्या असतील तर त्या मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.कोणाच्याही व्यक्तीगत भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता.

याआधीही मी हे वक्तव्य केले नाही, क्लिप बनविणाऱ्याने फक्त तेवढीच क्लिप बनविली त्यामागचा संदर्भ न टाकल्यामुळे गैरसमज होणे साहजिकच आहे. गैरसमज झाला (Alandi )असेल तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.