Chinchwad : अमित शहा यांच्या दौऱ्यासाठी दीड हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

एमपीसी न्यूज – शासकीय कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी (दि. 6) पिंपरी चिंचवड (Chinchwad) शहरात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी दौऱ्याच्या अनुषंगाने तब्बल दीड हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री शहरात येणार असल्याने सर्वच यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी अमित शहा यांच्या दौऱ्याची रंगीत तालीम देखील केली. केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलिसांनी संशयीतांची झाडाझडती घेत प्रतिबंधात्मक कारवाया देखील केल्या आहेत.

Talegaon Dabhade : आदर्श विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मिळविले शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान

शहा यांच्या दौऱ्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात केला आहे. यामध्ये सहपोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, सहा पोलीस उपायुक्त, दहा सहाय्यक पोलीस आयुक्त, 42 पोलीस निरीक्षक, 137 सहाय्यक पोलीस निरीक्षक/ पोलीस उपनिरीक्षक, 1 हजार 319 पोलीस अंमलदार, राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी आणि बॉम्ब शोधक नाशक पथकाच्या सहा तुकड्या बंदोबस्तासाठी (Chinchwad) तैनात केल्या आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.