Talegaon Dabhade : आदर्श विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मिळविले शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान

एमपीसी न्यूज – मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित आदर्श विद्या (Talegaon Dabhade) संकुलातील इयत्ता पाचवीतील लवीत कैलास पाटील हा विद्यार्थी 230 गुण मिळवून उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात 270 वा तर तालुक्यात पाचवा आला. कृष्णा विजय खेडकर याने 218 गुण मिळवले असून जिल्ह्यात 457 वा तर तालुक्यात आठवा आला आहे. उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चिन्मयी धुंडीराज लिमये हिला 224 गुण मिळाले असून जिल्ह्यात 155 वा तर तालुक्यात तिसरा क्रमांक मिळाला आहे.

राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी विद्यालयातील तन्वी गोविंद जाधव, हर्षवर्धन संजय पाटील, सिद्धी स्वप्निल दाभाडे,समर्थ सुभाष पवार, धनश्री ज्ञानोबा शिंदे या पाच विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना नववी ते बारावीपर्यंत 9600 प्रतिवर्षी याप्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे.

वरील सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ शाळेत संपन्न झाला. समारंभास संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे उपस्थित होते. शिष्यवृत्ती प्राप्त सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व रोप भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पालकांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.

Pimpri : खबरदार! चोरीची वाहने घ्याल तर तुम्हीही व्हाल आरोपी

शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शक शिक्षक प्रतीक्षा ढवळे,राजश्री बनसोडे,सुजाता डावखरे,प्रमोद गोसावी,कीर्ती मोहरीर, स्वाती शिंदे,संभाजी ठाकूर, किसन पाटील,श्रीहरी तनपुरे या शिक्षकांचाही संस्थेकडून सन्मान करण्यात आला. पालक व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सर्व शिक्षकांचे आभार मानले.

संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे यांनी स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करून संस्थेला या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाचा अभिमान असल्याचे सांगितले व पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक संतोष खामकर यांनी विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे प्रोत्साहन आणि संस्थाचालकांचे पाठबळ यामुळे हे यश साध्य झाले असल्याचे सांगून कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार मानले.

कार्यक्रमाचे (Talegaon Dabhade) सूत्रसंचलन प्रतीक्षा ढवळे यांनी केले. उत्साहात  कार्यक्रम संपन्न झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.