Alandi : डंपरच्या धडकेत एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार एकाचा (Alandi) मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.5) सायंकाळी साडेसात वाजता देहु-आळंदी रोड येथे घडला आहे.

अतिन्द्र अरबिंदू मल्लीक (वय 24 रा. चिखली) यांनी शनिवारी (दि.6) भोसरी एमआयडीसी फिर्याद दिली आहे. यावरून संजीतकुमार महेश सहानी (वय 23 रा. नेवाळेवस्ती, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Akurdi : साक्ष देऊ नये म्हणून खंडणी मागत एकाला माराहाण; 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील अरबिंदू मल्लीक हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना त्यांना डंपरने धडक दिली यात दुचाकीस्वार मल्लीक यांचा मृत्यू झाला. यावरून डंपर (Alandi) चालक संजीतकुमार याच्यावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.