PCMC : लाच प्रकरणी सहाय्यक उद्यान निरीक्षक निलंबित

एमपीसी न्यूज – लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महापालिकेच्या सहाय्यक उद्यान निरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे.

PCMC : आता नाट्यगृहाचे बुकिंग क्रीडा विभागात होणार

किरण अर्जुन मांजरे असे निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक उद्यान निरीक्षकाचे नाव आहे. त्याची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागात सहाय्यक उद्यान निरीक्षक या पदावर किरण मांजरे काम करत होता. एका ठेकेदाराला दोन फर्मचे ऑडिट रिपोर्ट अनुकूल देण्यासाठी आणि उद्यानाच्या केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 17 हजार रूपयांची लाच मागितली.

17 हजार रूपयांची लाच घेताना मांजरे यास 8 जूनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नेहरूनगर येथे रंगेहाथ पकडले होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली आहे. त्यानंतर मांजरे याला पालिका सेवेतून निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत. या आदेशाची मांजरे याच्या सेवा नोंद पुस्तकात नोंदही करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.