PCMC : आता नाट्यगृहाचे बुकिंग क्रीडा विभागात होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील (PCMC) नाट्यगृहांच्या बुकिंगची जबाबदारी आता महापालिकेच्या क्रीडा विभागाकडे देण्यात आली आहे. नाट्यगृहांच्या कामकाजामध्ये सुसूत्रता यावी, कामकाजाचा वेग वाढावा, यासाठी हा बदल करण्यात आला आहे. यापुढे सर्व नाट्यगृहाच्या बुकिंगसाठी क्षेत्रीय कार्यालयाऐवजी खराळवाडी येथील क्रीडा विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे.

Chinchwad : साहित्य जगाची तर संगीत साहित्याची भाषा – मधू जोशी

पिंपरी चिंचवड शहरात रामकृष्ण मोरे नाट्यगृह, आचार्य अत्रे रंगमंदिर, नटसम्राट निळू फुले नाट्यगृह, अंकुशराव लांडगे नाट्यगृह व ग. दि. माडगूळकर नाट्यगृह अशी एकूण पाच नाट्यगृहे आहेत. या नाट्यगृहांचे कामकाज संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत केले जात होते. मात्र, महापालिकेच्या या निर्णयामुळे नाट्यगृहांच्या बुकिंगसाठी आता क्रीडा विभागाशी संपर्क करावा लागणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.