Baba Maharaj Satarkar : कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रबोधन करणारे ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे ( Baba Maharaj Satarkar ) आज निधन झाले आहे. ते 89 वर्षांचे होते. नवी मुंबईतील नेरूळ इथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ (Nerul) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

Maval : उसाला प्रतिटन 3300 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी संत तुकाराम साखर कारखान्यावर मोर्चा

बाबा माहाराज सातारकर यांचे पार्थिव आज दुपारी तीननंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदीरात ठेवण्यात येईल.

बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं. त्यांच्या घरी शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे.

बाबा महाराज सातारकर यांनी  कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांचं प्रबोधन केले. तसेच आपले आयुष्य अध्यात्माच्या प्रचार प्रसारासाठी ( Baba Maharaj Satarkar ) अर्पण केले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.