Maval : उसाला प्रतिटन 3300 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी संत तुकाराम साखर कारखान्यावर मोर्चा

एमपीसी न्यूज – उसाला प्रति टन 3300 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी  ( Maval)  सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्हा शेतकरी युनियन आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने संत तुकाराम साखर कारखाना, कासारसाई येथे मोर्चा काढला जाणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मागणी प्रमाणे रक्कम बँक खात्यात दिवाळीपूर्वी जमा करावी, तरच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल असेही दाभाडे यांनी म्हटले.
संत तुकाराम साखर कारखान्यावर पुणे जिल्हा शेतकरी युनियनच्या वतीने तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने उसाला प्रतिटन 3300 रुपये भाव मिळावा यासाठी सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चाचे आयोजन 3 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 10 वाजता संत तुकाराम सहकारी साखर कारखाना कासारसाई येथे केलेले आहे.

Pune Police : यंदा फटाके विक्री करताना व वाजविताना ही घ्या काळजी, फटाके विक्री व वापरावर पुणे पोलिसांची नियमावली जाहीर 

कारखान्याचे चेअरमन, मावळचे तहसीलदार यांना माऊली दाभाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे  की, संत तुकाराम साखर कारखान्याच्या वार्षिक सभेसाठी प्रसारित केलेल्या ताळेबंद अहवालामध्ये दिलेला 8 कोटी निव्वळ नफा व 2 कोटींची आयकर  भरण्यासाठी केलेली तरतूद म्हणजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची केलेली घोर फसवणूकच आहे असा आरोप सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी केला आहे.

वास्तविक पाहता साखर उत्पादक उद्योगाला आयकर माफ असून साखर कारखान्याला सहवीज प्रकल्पातून देखील 14 कोटी रूपये उत्पन्न प्राप्त होत आहे,.अशा एकूण 24 कोटीं रूपयांचा हिशोब ताळेबंद अहवालात मांडण्यात आला आहे.  तसेच 30 रुपये क्विंटल प्रमाणे अथवा 3000 रुपये टनाने साखर विक्री होत असताना साखर कारखाना 2634 रुपये एवढाच नाममात्र भाव देत आहे .
मग 3700 रुपये टनाने  2 लाख टन  साखर विक्री केल्याने एकूण 14 कोटी रुपये अधिकचे प्राप्त होतात असे एकूण 38 कोटी रुपये अतिरिक्त प्रमाणात साखर कारखान्याकडे जमा होतात तसेच मागील बारा वर्षाचे 200 रुपये प्रत्येक टनाला कारखान्याकडून शेतकऱ्यांना येणे आहे.
म्हणूनच  शेतकऱ्यांना प्रत्येक टनाला साखर  कारखान्यानी 3300 रुपये प्रति टन भाव मान्य करून दीपावलीपूर्वी रक्कम अदा करण्यात यावी जेणे करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी होईल असे माऊली दाभाडे यांनी नमूद केले आहे.
यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी भव्य मोर्चाचे आयोजन 3 नोव्हेंबर रोजी सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे तरी तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सदर मोर्चामध्ये आपली उपस्थिती दाखवून साखर कारखान्याच्या एकतर्फी भोंगळ कारभाराचा निषेध व्यक्त करावा असे आवाहन माऊली दाभाडे यांनी व्यक्त केले ( Maval) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.