Pune Police : यंदा फटाके विक्री करताना व वाजविताना ही घ्या काळजी, फटाके विक्री व वापरावर पुणे पोलिसांची नियमावली जाहीर

एमपीसी न्यूज – दिवाळी सणानिमित्त दरवर्षी तात्पुरते फटाके विक्री परवाने या कार्यालयाकडून ( Pune Police ) देण्यात येतात फटाके विक्री करताना व फटाके वाजविताना कोणताही धोका अथवा अपघात होऊ नये यासाठी पुणे पोलिसांनी एक नियमावली जाहीर केली आहे.

Pune : पुणेकरांना 15 नोव्हेंबर पर्यंत मिळवता येणार मिळकतकरात 40 टक्के सूट

 

कायद्यामध्ये खालीलप्रमाणे तरतुद असून त्याप्रमाणे नागरीकांनी त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. असे आवाहान करत पुढील नियम पोलिसांनी जाहीर केले आहेत.

1. महाराष्ट्र शस्त्र अधिनियम (154) (3) अन्वये सरकारने कागदात स्फोटक पदार्थ ठेवलेले व त्याभोवती 42.534 ग्रॅम वजनाचा 5.715 सेंटी मीटर लांबीचा व 3.175 सेंटी मिटर व्यासाचा दो-याने गुंडाळलेला ॲटम बॉम्ब म्हणून ओळखल्या जाणा-या फटाक्यांच्या उत्पादनावर जवळ बाळगणा-यावर आणि विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

2 फटाके परवाने दि 1 ते दि 16 नोव्हेंबर पर्यंत देण्यात येणार आहेत. मुदत संपल्यानंतर फटाके अथवा शोभेची दारू यांची विक्री करता येणार नाही. तसेच शिल्लक राहिलेले फटाके अथवा साठा हा परवाना जवळ असलेल्या गोदामामध्ये किंवा घाऊक परवाना धारण करणा-वाकडे परत करणे आवश्यक आहे.

3. पोलीस आयुक्तालयाचे परिक्षेत्रामध्ये कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्यांपासून 10 मीटर अंतराचे आत मुंबई ( Pune Police ) पोलीस अधिनियम 1951 पोट कलम 33 यु मधील तरतुदी नुसार कोणत्याही प्रकारची शोभेची दारू अगर कोणत्याही नावाने ओळखले जाणारे फटाके फेकणे, सोडणे, उडविणे, अगर फायर बलून किंवा अग्निबाण उडविणे ही कृत्ये करण्यास मनाई आहे. सदर कलम 2 चे पोट कलम 15 अन्वये रस्त्यात कोणत्याही महामार्ग/पूल/सेतू मार्गावर नेमलेले मार्ग, सेतू कमानीचा घाट, धक्का किया कोणतीही आळी किंवा वाट मग ती रहदारीची असो अथवा नसो याचा समावेश होतो. या आदेशाचे उल्लंघन जी व्यक्ती करेल ती वरील कायदयान्वये (कलम 131 (ए) सह (1)) कायदेशीर कारवाईस पात्र ठरेल.

4.दिवाळी व इतर सणांच्या वेळी मोठया आवाजाचे फटाके उडविल्यामुळे निर्माण होणारे ध्वनी व हवा प्रदुषणाचे जनतेवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी असे फटाके वाजविण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. एखादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरावर 125 डेसीबल आवाज निर्माण करणा-या फटाक्यांचे उत्पादन विक्री व वापर यावर बंदी घालण्यात येत आहे.

जर साखळी फटाका 50 ते 100 तसेच 100 व त्यावरील फटाके असतील तर ( Pune Police ) आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून 4 मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे 115 /110 105 डेसीबल एवढी असावी. यापेक्षा जास्त आवाज निर्माण करणा-या तसेच 100 पेक्षा जास्त फटाके असलेल्या सर्व साखळी फटाका उत्पादन, विक्री व वापर यावर बंदी चालण्यात येत आहे.

* ध्वनी निर्माण करुन आवाजाचे प्रदूषण करणा-या फटाक्यांवर रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण बंदी घालण्यात येत आहे. परंतु जे फटाके विविध रंग निर्माण करतात किंवा सोडतात किंवा आवाज करित नाहीत अश्या फटाक्यांवर निर्बंध घालण्याची आवश्यकता नाही.

* शांतता प्रभागात कोणत्याही फटाक्याचा वापर कुठल्याही वेळेत करण्यात येऊ नये. शांतता प्रभागामध्ये रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालये यांच्या सभोवतालचे 100 मीटर पर्यंतचे क्षेत्र येते.

5. पेट्रोलियम तथा विस्फोटक सुरक्षा संघटनतर्फे परवानाधारक यांनी विदेशी मूळ फटाके विक्री करू नये अशा सूचना दिलेल्या आहेत.

6. ज्या ठिकाणी तात्पुरत्या फटाका स्टॉलकरिता परवानगी देण्यात आली आहे त्या ठिकाणी 50 मिटरच्या परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले ( Pune Police ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.