Badlapur : बदलापूरमध्ये केमिकल कंपनीत स्फोट होऊन भीषण आग ; एका कामगाराचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज – बदलापूरच्या  विके केमिकल कंपनीत पहाटेच्या सुमारास (Badlapur) मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली. या स्फोटामुळे तीन ते चार किलोमीटर परिसरात असणाऱ्या इमारतींना मोठे हादरे बसले आहेत. या केमिकल कंपनीला आग लागल्याने बाहेर असणाऱ्या दोन टेम्पोमधील केमिकलमध्ये प्रथम आग लागली त्यानंतर ही आग कंपनीमध्ये पसरली, अशी माहिती कंपनीतील कामगारांनी दिली.

JN.1 : पुन्हा जेएन.1 च्या रुग्णसंख्येत वाढ; सर्वाधिक रुग्ण पुण्यात

या स्फोटात चार ते पाच कामगार गंभीर जखमी झाले असून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बदलापूर, अंबरनाथमधील अग्निशमन गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे. आता कुलिंगचे काम (Badlapur) चालू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.