Badrinath : उत्तराखंड जोशीमठजवळ दरड कोसळली ;महामार्ग पूर्णपणे ठप्प झाल्याने हजारो पर्यटक अडकले

एमपीसी न्यूज- उत्तराखंडमधील जोशी मठजवळ काल (दि.4 ) दरड कोसळली (Badrinath) आहे. यामुळे बद्रीनाथ महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. दोन्ही बाजूचे हजारो पर्यटक अडकले आहेत.

जोशी मठजवळील हेलंग खोऱ्यात एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाचं काम सुरू आहे. त्यासाठी जमिनीखाली सुरूंग लावले जात आहेत. काल अशाच एका सुरुंगामुळे दरड कोसळली असावी, असा अंदाज स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत.

MPC News Podcast 05 May 2023 – ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

कोसळलेल्या दरडीमुळे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्ग ठप्प झाल्यामुळे हजारो प्रवासी अडकून पडले आहेत. यासंदर्भात प्रशासनाकडून माहिती जारी करण्यात आली आहे. कर्णप्रयागचे सीओ अमित कुमार म्हणाले, “हेलांगमधील बद्रीनाथ रस्ता सुरू झाल्यानंतर प्रवाशांना जाण्याची परवानगी दिली जाईल. तोपर्यंत कोणालाही या महामार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी नसेल, सुरक्षेच्या कारणांमुळे वाहतूक पोलिसांकडून आवाहन करण्यात आलेलं (Badrinath) आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.