Bank of Baroda : सीबीआय विशेष न्यायालयाचा निकाल; बँकेचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल तत्कालीन व्यवस्थापकाला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

एमपीसी न्यूज – सीबीआय प्रकरणांसाठी मुंबईच्या विशेष न्यायाधीशांनी (  Bank of Baroda) बँक ऑफ बडोदा, वाळकेश्वर रोड शाखा, मुंबईचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक रामचंद्र श्रीधर जोशी यांना दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये बँकेचे नुकसान केल्याबद्दल अनुक्रमे दोन वर्षे आणि एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा तसेच 4 लाख 37 हजार 500 रुपये एकत्रित दंड ठोठावला आहे.

पहिल्या प्रकरणात, सीबीआय प्रकरणांसाठी मुंबईचे विशेष न्यायाधीश यांनी बँक ऑफ बडोदा, वाळकेश्वर रोड शाखा, मुंबईचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक रामचंद्र श्रीधर जोशी यांना 3 लाख रुपयांच्या दंडासह दोन वर्षांची शिक्षा सुनावली. केंद्रीय अन्वेषण विभागाने 12 मे 1994 रोजी जोशी आणि इतरांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल केला होता. एकूण 10.50 कोटी रुपयांचा (अंदाजे) गैरव्यवहार करून बँक ऑफ बडोदाची फसवणूक करण्यासाठी आरोपीने खाजगी व्यक्तीसोबत गुन्हेगारी कट रचला आणि फसवणुकीच्या मार्गाने सदर रक्कम त्या खाजगी व्यक्तीच्या खात्यात वळती केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे बँकेचे नुकसान झाले आहे .

तपासानंतर 27 डिसेंबर 1996 रोजी तत्कालीन मुख्य व्यवस्थापक आणि एका खाजगी व्यक्तीसह दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने सदर आरोपीला दोषी ठरवले आणि त्यानुसार खटल्यानंतर त्याला शिक्षा सुनावली. खटल्यादरम्यान दुसऱ्या आरोपपत्रातील आरोपी (खाजगी व्यक्ती) चा मृत्यू झाल्यामुळे खटला थांबला.

Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचा तन्मय पडेकर पुणे विद्यापीठात प्रथम तर वैष्णवी येळवंडे द्वितीय

दुसऱ्या प्रकरणात, सीबीआय प्रकरणांसाठी मुंबईच्या विशेष न्यायाधीशांनी बँकेचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक रामचंद्र श्रीधर जोशी यांना एक वर्षाचा सश्रम कारावास आणि 1 लाख 37 हजार 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सीबीआयने जोशी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 5 कोटी  (अंदाजे) रुपयांचा गैरव्यवहार करून बँक ऑफ बडोदाची फसवणूक करण्यासाठी आरोपीने खाजगी व्यक्तीसोबत गुन्हेगारी कट रचला आणि फसवणुकीच्या मार्गाने ही रक्कम त्या खाजगी व्यक्तीच्या खात्यात वळती केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्यामुळे बँकेचे नुकसान झाले आहे .

तपासानंतर 24 डिसेंबर 1996 रोजी रामचंद्र श्रीधर जोशी सह चार आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले आणि त्यानुसार त्याला शिक्षा सुनावली. आरोपपत्र दाखल केलेल्या दोन आरोपींचा खटल्यादरम्यान मृत्यू झाल्यामुळे खटला थांबवण्यात आला तर अन्य आरोपीला दोषमुक्त करण्यात आले (  Bank of Baroda) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.