Talegaon Dabhade : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीचा तन्मय पडेकर पुणे विद्यापीठात प्रथम तर वैष्णवी येळवंडे द्वितीय

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मे 2020 मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या (Talegaon Dabhade) गुणवंत विद्यार्थ्यांचा यादी नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजीच्या तन्मय पडेकर प्रथम आणि वैष्णवी येळवंडे द्वितीय आली आहे.गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
नुकत्याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार मे 2020 मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या  विद्यापीठामध्ये आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार  या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम आणि द्वितीय येण्याचा मान पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट तसेच नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना मिळाला आहे.

तन्मय पडेकर हा इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी शाखेचा विदयार्थी 9.93 सीजीपीए इतके गुण प्राप्त करून विद्यापीठात सर्व प्रथम तर वैष्णवी येळवंडे या संगणक शाखेच्या विद्यार्थिनीने 9.86 सीजीपीए गुण मिळवून विद्यापीठामध्ये द्वितीय येण्याचा मान मिळविला आहे.
या यशामुळे संस्थेचे अध्यक्ष संजय (बाळा) भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे,सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार,कार्यकारी समितीचे चेअरमन तसेच संस्थेचे खजिनदार राजेश म्हस्के,कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. विलास देवतारे यांनी अभिनंदन केले. प्रथम य.वर्ष विभागप्रमुख डॉ. शेखर राहणे यांनी मार्गदर्शन (Talegaon Dabhade) केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.