Pimpri : शहरात मोठ्या उत्साहात बाप्पांचे घरोघरी आगमन

एमपीसी न्यूज – श्रावण संपला रम्य चतुर्थीची पहाट झाली, सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे आली..आली…गणाधिशाची स्वारी आली….अशाच रम्य व भक्तीमय वातावरणात उद्योगनगरी पिंपरी (Pimpri) -चिंचवडमध्ये बाप्पा घरोघरी विराजमान होत आहेत. शहरातील बाजारपेठ फुले, पुजेचे साहित्य, प्रसाद, गणरायाच्या मुर्ती, सजावटीचे साहित्य यांनी अक्षरशः फुलून गेल्या आहेत.

Pune : गणेशोत्सवादरम्यान पुढील 11 दिवस ड्रोन वर बंदी

भाविक जमेल त्या पद्धतीने गणरायाला आपल्या घरी आणत आहेत. बाप्पा दुचाकी, कार तर काहींच्या घरी अगदी पायी तेवढ्याच भक्तीभावाने जात आहेत. घरगुती गणपती प्रमाणे मंडळांच्या कार्यकर्त्यांचीही एकच लगबग सुरु आहे. वेळेत प्राणप्रतिष्ठापणा कऱण्यासाठी सर्व जण मन लावून तयारी करत आहेत.

गणरायाच्या या अगमनाला वरुणराजानेही काल पासूनच हजेरी लावली आहे. पावसाच्या सरीमध्ये भिजत बाप्पा घरी जात आहेत. सध्या कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्यामुळे पुण्यासह राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे. कोकण, घाटमाथा, आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे.

या सर्व गणेशोत्सवावर पोलिसांची देखील करडी नजर असून नागरिकांना कोणताही अनुचित प्रकार दिसला असता त्वरीत पोलिसांशी संपर्क कऱण्याचे आवाहान पोलिसांनी केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिके देखील या उत्सवासाठी पुर्णपणे सज्ज झाली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.