Bavdhan : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्या प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – हॉस्टेलच्या महिला कर्मचाऱ्याशी अर्वाच्य भाषेत बोलत (Bavdhan) अश्लिल फोटो पाठवून विनयभंग केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 16 जून रोजी बावधन येथील एका खासगी हॉस्टेल येथे घडला आहे.

Talegaon Dabhade : बांधकाम साईट विकण्याचा बहाणा करत व्यावसायिकाची अडीच कोटीची फसवणूक

याप्रकऱणी महिलेने शुक्रवारी (दि.23) पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शंकर नामदेव सणस (रा.बावधन) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या संबंधीत हॉस्टेलवर काम करतात.आरोपी देखील त्याच हॉस्टेलवर राहतो. त्याने फिर्यादीला फोन करून अर्वाच्य भाषेत बोलत फिर्यादीला शिवीगाळ केली. तसेच अश्लिल फोटो पाठवून फिर्यादीचा विनयभंग केला. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत (Bavdhan)  आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.