Maval : हॉर्न वाजवला म्हणून शिवीगाळ करत कानशीलात भडकावले

एमपीसी न्यूज –  दुचाकी हॉर्न जोरात वाजला म्हणून टोळके जमवून (Maval) हातात काठ्या घेत एकाच्या कानशिलात भडकावल्याचा प्रकार मावळातील ओझर्डे गावात गुरुवारी (दि.22) घडला आहे.

याप्रकरणी अक्षय कुंडलीक पारकी (वय 27 रा. ओझर्डे) यांनी गुरुवारी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दत्तात्रय ओझरकर, रामदास ओझरकर, लक्ष्मण ओझरकर, भानूदास ओझरकर, तानाजी ओझरकर, अर्जून ओझरकर, शंकर ओझरकर (सर्व रा. ओझर्डे, मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bavdhan : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्या प्रकरणी एकावर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपीच्या कारच्या मागे जोराने हॉर्न वाजवला, याच्या रागातून आरोपींनी भांडण सुरु केले. यावरून आरोपींनी इतरांना सोबत बोलावून फिर्यादीच्या दुकानात काठ्या घेऊन आले असता फिर्यादी लपले. यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांच्या कानाखाली मारले. यावरून शिरगाव पोलिसांनी आरोपींना सीआरपीसी 41(अ) (1) प्रमाणे नोटीस बजावली (Maval) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.