Chakan : मेदनकरवाडी येथे अडीच लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज – चाकण येथील ( Chakan) मेदनकरवाडी परिसरातील बंद फ्लॅटचा दरवाजाचे कुलूप तोडून अडीच लाखांची घरफोडी करण्यात आली आहे. ही चोरी बुधवार (दि.21) व गुरुवारी (दि.22) या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी बापू देवराम रायकर (वय 31 रा. मेदनकरवाडी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात पिर्याद दिली असून अज्ञात चोरा विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Maval : हॉर्न वाजवला म्हणून शिवीगाळ करत कानशीलात भडकावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा फ्लॅट बंद असताना चोरांनी घराच्या दरवाज्याचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.यावरून चाकण पोलीसांनी तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत ( Chakan) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.