AAP: नदीपात्रातील जलपर्णी लवकर काढा, अन्यथा आयुक्तांना जलपर्णीचा हार घालू – रविराज काळे

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी, (AAP) पवना, मुळा नदीपात्रातील जलपर्णी लवकरात लवकर काढावी. अन्यथा आयुक्तांना जलपर्णीचा हार घालण्याचा इशारा आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांनी दिला आहे.

नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी थेट पद्धतीने वारंवार कामे दिले. आजपर्यंत गेल्या एक वर्षात अंदाजे 8 कोटी रुपयांची कामे थेट पद्धतीने देऊन सुद्धा जलपर्णीचा विळखा शहरातील नद्यांना पडलेला दिसतो. गेले दिड वर्ष महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून आयुक्त  काम पाहत आहेत.

परंतु आताही शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार चालू आहे.आरोग्य विभागामार्फत पूर्वीच्याच ठेकेदारांना पुन्हा काम देण्यात आले होते. मात्र याच ठेकेदारांवर आरोग्य विभागाची मेहरबानी का? याच ठेकदारांवर सतत जलपर्णी वरून आरोप होत असताना कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता थेट पद्धतीने का दिले जात होते?

आरोग्य विभाग आणि ठेकेदारांचे आर्थिक हितसंबंध जोपासणे एवढेच काम महानगरपालिकेकडून होत होते का?

आरोग्य विभागाने तिन्ही नदीपात्रातील जलपर्णी काढत नाही. (AAP) ठेकेदाराप्रमाणेच पावसाच्या पाण्याने जलपर्णी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून वाहून जाण्याची वाट पाहिली जात आहे का,  आठ दिवसांत जलपर्णी काढण्यात आली नाही तर आम्ही आम आदमी पार्टीकडून त्याच जलपर्णीचे तोरण करून महानगरपालिकेच्या गेटला बांधू अन्यथा महानगरपालिका आयुक्त म्हणून आपणास त्याच जलपर्णीचा हार करून घालू असा इशारा दिला आहे.

Maval : हॉर्न वाजवला म्हणून शिवीगाळ करत कानशीलात भडकावले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.