Russia War : रशियामध्ये मोठी बंडखोरी; मॉस्कोच्या सुरक्षेत वाढ

एमपीसी न्यूज : रशियाच्या बाजूने लढणारा (Russia War) वॅगनर ग्रुपने आता रशिया विरुद्धच बंड पुकारले आहे. गेल्या काही दिवसांपासून वॅगनर ग्रुप आणि मॉस्कोमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. आता वॅग्नर ग्रुपचे नेते येव्हगेनी प्रिगोगिन यांनी जाहीर केले आहे, की त्यांचे सैनिक युक्रेनमधून सीमा ओलांडून रशियात दाखल झाले आहेत. ते रशियन शहर रोस्तोव-ऑन-डॉनकडे जात आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या मार्गात अडथळा आणणाऱ्यांचा नाश केला जाईल असे आव्हानही त्यांनी केले आहे. 

 

रशियाने वॅगनर समूहाच्या प्रमुखाच्या अटकेचे आदेश देण्याबरोबरच राजधानी मॉस्कोची सुरक्षा वाढवली आहे. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांच्या मते, राजधानीत “दहशतवादविरोधी” उपाययोजना केल्या जात आहेत. मेसेजिंग अॅप टेलिग्राममध्ये सोब्यानिन यांनी सांगितले की, “मॉस्कोपर्यंत पोहोचलेली माहिती (Russia War) लक्षात घेता, शहराची सुरक्षा वाढवण्यासाठी दहशतवादविरोधी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.”

वॅग्नर ग्रुपने रशियन लष्करी राजवटीविरुद्ध बंड करणाऱ्या सशस्त्र गटांना पाठिंबा दिला आहे. या बंडखोरांना मॉस्कोची लष्करी शक्ती उलथून टाकायची आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे या लष्करी सामर्थ्याचे प्रमुख आहेत.

एकेकाळी रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीनची गुप्त आणि लढवय्या आर्मी म्हणून वॅगनर ग्रुपची ओळख होती. मात्र, अचानक केलेल्या वॅगनर ग्रुपच्या आव्हानाने संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. रशियातील या अंतर्गत युद्धाचा परिणाम केवळ रशिया नाही, तर संपूर्ण जगाला भोगावा लागणार आहे.

AAP: नदीपात्रातील जलपर्णी लवकर काढा, अन्यथा आयुक्तांना जलपर्णीचा हार घालू – रविराज काळे

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.