Bawdhan :  कापड व्यावसायिकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

एमपीसी न्यूज – कोथरूड येथील कापड व्यावसायिकाचा (Bawdhan) पाठीत वार करून खून केला असून त्याचा मृतदेह बावधन येथील मोकळ्या जागेत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला आहे.हा प्रकार 13 एप्रिल रोजी उघडकीस आला.
याप्रकरणी सोमवारी (दि.17) हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, बावधन येथील गंगा लिजंट सोसायटी लेबर कंप जावळील मोकळ्या जागेत हा मृतदेह सापडला, मृतदेह कुजलेला होता,दुर्गंधी सुटल्याने प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी मृताची ओळख पटवली असून त्याचे नाव नितेश हरिभाऊ काळभोर (वय 42रा. संगम चौक कोथरूड) नितेश हे कापड दुकानदार होते.त्यांच्या पाठीत धारदार शस्त्राने वार करण्यात आले ज्यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र खून कोणी व का केला याचा हिंजवडी पोलीस तपास (Bawdhan) घेत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.