Pimpri : किरकोळ कारणावरून पतीकडून पत्नी व मेहुणीला मारहाण

एमपीसी न्यूज : पाणी भरण्यासाठी इथे का आली म्हणत पतीकडून पत्नी व तिच्या बहिणीला मारहाण करत शिवीगाळ करण्यात आली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.28) पिंपरी (Pimpri) येथे घडला.

Chinchwad : आषाढी एकादशीनिमित्त श्री फत्तेचंद जैन विद्यालयामध्ये अश्व रिंगण सोहळा

याप्रकरणी महिलेने पिंपरी (Pimpri) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तिचा पती (वय 25) व दोन महिला आरोपी  सर्व राहणार पिंपरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण राहते घरासमोर नळाला पाणी भरत असताना फिर्यादी यांचा पती तिथे आला व तू इथे काय करत आहेस तुला इथे कोणी बोलावलं आहे म्हणत त्याने फिर्यादीच्या बहिणीला शिवीगाळ केली.

 

तसेच आरोपीचे कुटुंबीय हे फिर्यादीच्या घरी आले व त्यांनी त्यांची बहीण व फिर्यादी यांना मारहाण करत शिवीगाळ केली व घरातून हाकलून देत घराला कुलूप लावले. यावेळी धक्काबुक्की मध्ये अश्लील वर्तन करत फिर्यादी यांचा विनयभंग झाल्याची तक्रार पिंपरी (Pimpri) पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.