Chinchwad : आषाढी एकादशीनिमित्त श्री फत्तेचंद जैन विद्यालयामध्ये अश्व रिंगण सोहळा

एमपीसी न्यूज – चिंचवड (Chinchwad ) येथील श्री फत्तेचंद जैन विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त बुधवारी (दि २८) पालखी रिंगण आणि अश्व रिंगण सोहळा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात देवशयनी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगून सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Mahalunge : कंपनीची गोपनीय माहिती चोरून कंपनीचे चार कोटीचे नुकसान केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे मानद सरचिटणीस राजेंद्रकुमार शंकरलाल मुथा , सहसचिव प्रा.अनिलकुमार मोतीलाल कांकरिया यांची प्रमुख उपस्तीथी होती व त्यांनी सर्वाना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देखील दिल्या. यावेळी प्रमुख उपास्तीथ्यांच्या हस्ते पालखी पूजन, विठ्ठल रुक्मिणी प्रतिमापूजन, अश्वपूजनाचे कार्यक्रम करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताई, संत सोपानदेव, संत तुकाराम, संत जनाबाई यांचा विविध वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी टाळ्या, ढोल पथक व लेझीम पथकाद्वारे पाहुण्यांचे स्वागत केले. पालखी प्रस्थान व भव्य अश्वरींगणाने सोहळा रंगतदार झाला

क्रीडा शिक्षक व शिक्षक प्रतिनिधी सुनील चोरडिया यांचे ‘आषाढ वारी’ या विषयावरील चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्धाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘माऊली, माऊली’ , ‘देवा तुझ्या नामाचा रे’ गीत’ सादर केले . शिक्षकांनी ‘चंद्रभागेच्या तिरी हा’ अभंग सादर केला. तसेच उपमुख्याध्यापिका मनीषा जैन ,पर्यवेक्षिका मनीषा कलशेट्टी यांनी ‘पंढरीची विठाई’ व ‘निवृत्ती सोपान’ यावर गजर सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या सुनिता नवले यांनी केले. सूत्रसंचालन मेघा नलावडे यांनी केले व आभार उपमुख्याध्यापिका मनीषा जैन यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन पर्यवेक्षक संजीव वाखारे व राजेंद्र पितळीया यांनी केले. याप्रसंगी शिक्षक प्रतिनिधी निर्मला चव्हाण तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.