Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज – कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात साजरा झाला. आषाढी एकादशीचे महत्त्व सांगून हरिनामाचा जयघोष करत पालखी काढून शाळेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.

Alandi : हरिनामाच्या गजरात माऊलींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा

यावेळी संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे, मंगला काकडे, खजिनदार गौरी काकडे, सचिव राजश्री म्हस्के, राजश्री शहा तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर उपस्थित होत्या.

 

मान्यवरांच्या हस्ते प्रथम विठ्ठल- रखुमाईच्या पालखीचे पूजन करण्यात आले. गौरी काकडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘विद्यार्थ्यानी अभ्यासाबरोबर आपल्या आराध्य देवतेचे नामस्मरण करून ऊर्जा मिळवावी’.

 

आषाढी वारीचे महत्त्व पटवून देताना शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर म्हणाल्या, ‘आषाढी वारी ही आपली संस्कृती आहे, देवाचे नामस्मरण हे आपल्याला देवाशी जोडते, तसेच सफेद कपडे घालून वारीला जाणे, म्हणजे शांततेचा संदेश आपण देतो, असे मोलाचे मार्गदर्शन अय्यर यांनी केले.

 

शिक्षिका पद्मजा सातव यांनी आपल्या भाषणात आषाढी दिनाचे महत्त्व सांगितले. पारंपरिक वेशभूषेत पखवाज, टाळ, मृदुंगाच्या साथीत सहभागी झालेले विद्यार्थी वारकरी, सावळ्या विठ्ठल रखुमाईचे रूप धारण केलेल्या विद्यार्थ्यांचे रूप पाहण्यासारखे होते. इयत्ता ४थी ते ८वीच्या विद्यार्थ्यानी ‘ कानडा राजा पंढरीचा ‘ हा अभंग सादर केला.  तसेच शाळेतील शिक्षकांनी ‘ विठू माउली तू ‘ हे गाणे गाऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

 

विद्यालयाच्या वतीने दिंडी काढण्यात आली. यात कोणी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर तर कोणी संत मुक्ताबाई झाले होते. विद्यार्थ्यानी हातात भगव्या पताका नाचवत विठुरायाच्या नामाचा व ग्यानबा तुकारामाचा गजर करत पालखी काढली. सर्व विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साह होता. सूत्रसंचालन शिक्षिका श्रध्दा अल्हाट यांनी केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.