Pimpri : ग्लोबल टँलेंट इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्यांनी साजरी केली आषाढी एकादशी

एमपीसी न्यूज –  टाळ व विणेचा नाद, विठुमाऊलीचा गजर (Pimpri) अशा भक्तीमय वातावरणात  ग्लोबल टँलेंट इंटरनॅशनल स्कूलच्या  चिमुकल्यांनी बुधवारी (दि.28) आषाढी एकादशी साजरी केली.यावेळी चिमुकल्यांनी पालखी तयार केली होती, वारकऱ्यांचा वेष धारण करून ‘पंढरीची वारी करी वारकरी ,उन्ह पावसाची चिंता कोण करी’ या ओळी प्रमाणे सारे तल्लीन झाले होते.

सर्वात प्रथम कार्यक्रमास उपस्थित असलेले शाळेचे व्यवस्थापक डॉ. ललित कुमार धोका व डॉ. स्वप्नाली धोका  तसेच शाळेच्या मु ख्याध्यापिका विद्युत सहारे यांचे स्वागत करण्यात आले. विठ्ठल रखुमाईच्या मुर्तीचे पूजन करण्यात आले.

PCMC : बर्ड व्हॅली, गणेश तलाव, भोसरी तलावाचे होणार सुशोभिकरण

पूनम शेलकर, स्वप्ना अगवेकर व मनीषा वेदपाठक यांनी आषाढी एकादशी चे महत्व सांगितले तसेच भगवद्गीता व ज्ञानेश्वरी यांच्यातील संबंध काय? याविषयीची माहिती  मोक्षदा कदम यांनी सांगितली.

याबरोबरच विद्यार्थ्यांना बकरी ईद चा इतिहास काय? महत्त्व व काय संदेश मिळतो याविषयी देखील महत्वपुर्ण माहिती  सानिया शेख यांनी अगदी उत्तमरित्या दिली. पूर्व प्राथमिक व प्राथमिक स्तरावरील मुलांनी अभंग सादर केले.

सीमा देसाई यांनी अभंग प्रस्तुत केला. माध्यमिक स्तरावरील मुलांनी भक्तीमय वातावरणात नृत्य सादरीकरण केले. शाळेच्या व्यवस्थापक डॉ. स्वप्नाली धोका  यांनी मुलांचे कौतुक केले. मोक्षदा कदम यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. सर्वात शेवटी विठुरायाची आरती व पालखीचे पूजन करून विठू माऊलीच्या जय घोषात दिंडी काढण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुनम शेलकर यांनी केले. अशा प्रकारे आषाढी एकादशी निमित्त रंगलेला हा सोहळा उत्साहात पार (Pimpri) पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.